आता साताऱ्यात गुलाल उधळायला बोलवा- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी साता-यात कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आल होतं. या निमित्ताने शरद पवार रविवारी साता-यात आले होते.  यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने शहरातुन भव्य र‌ॅली काढत पक्षाची ताकद दाखवुन दिली, तर यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी “सरकार किल्ले पर्यटणासाठी देते परंतू छत्रपतीच्या पराक्रमाची ही प्रतिकं आहेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी चमकल्या आहेत त्याच ठिकाणी आता छम छम एैकायला मिळेणार आहे” असे म्हणत राज्य सरकार तसेच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंवर जोरदार टीका केली. ‘साताऱ्यात राष्ट्रवादीचा निश्चित असून आता केवळ गुलाल उधळायला बोलवा’ असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान मेळाव्यात शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की,’पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घालत आहे ते’ असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही.

शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आणि सातारच्या राजकारणाचे समीकरणच बदलून गेले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आता भाजपमय झाल्याचे चित्र निवडणुकीच्या आधी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर असताना साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी उदयनराजे यांचा चांगलाच समाचार घेत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयन्त केला. उदयनराजे विरोधात श्रीनिवीस पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडून चर्चेत असताना साताऱ्याचा गड नेमकं कोण राखेल हे पाहणे औस्त्युक्याचे आहे.

Leave a Comment