संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी; काँग्रेस काय भूमिका घेणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी, शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

अंदमानात सावरकरांनी जी शिक्षा भोगली तिथे त्यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी धाडायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही पक्षविरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वाद ओढवून घेताना दिसत आहेत. आधी उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याच्या पुरावा द्या म्हणून विचारणा करणं, त्यानंतर इंदिरा गांधी यांचे मुंबईतील तत्कालीन गुन्हेगारी विश्वातील गुंडांशी संबंध असल्याचे सांगणे यावरून गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

राऊत यांच्या या दोन्ही वक्तव्यांवरून भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले होते. इंदिरा गांधी यांच्या वक्तव्यावरून आधीच काँग्रेस नेते संजय राऊत यांच्यावर भडकले असताना राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुढं करत शिवसेनेच्या अडचणीत भर घातला आहे. शिवसेना काँग्रेससोबत राज्यात सरकार चालवत असताना काँग्रेसचा सावरकांना भारतरत्न देण्याबाबत विरोध पाहता राऊत यांचे वक्तव्य शिवसेनेला अडचणीत आणणारे सध्यातरी दिसत आहे.

Leave a Comment