धक्कादायक !! मेढा-मारली घाटात सापडले सांगलीच्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

साताऱ्यात काही वर्षांपूर्वी डॉक्टर असल्याची बतावणी करुन निरपराध लोकांना मारून टाकणाऱ्या संतोष पोळने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. लोकांची हत्या करूनही ६-७ वर्षं प्रकार उघडकीसच न येण्याची सोय सिरीयल किलर संतोष पोळने केली होती. त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

या चार जणांच्या खुनातील तिघांचे मृतदेह सापडले असून एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोली गावातील आहेत. दोन मुलांसह आई वडीलांना घाटातील जंगलात मारून फेकून दिल्याचा हा निर्दयी प्रकार उघडकीस आला आहे. या चौघांच्याही शरीराचे तुकडे करून अस्ताव्यस्त पद्धतीने फेकून देण्यात आले आहेत. या प्रकरणात जावली तालुक्यातील सोमर्डी गावातील संशयित आरोपी योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment