शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला ‘हा’ आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी पक्षाचा काहीही संबंध नसून राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही असं विधान शरद पवार यांनी शिवसेनेसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचं एकूण संख्याबळ १७० च्या आसपास असून पक्षांतरबंदी कायदा लागू केल्यानंतर फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचंही शरद पवार पुढे म्हणाले.

पत्रकार परिषदेवेळी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांनी आम्हाला फसवून राज्यपालांकडे नेलं असल्याचं सिंदखेदराज्याचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीसुद्धा मी शरद पवारांसोबतच असल्याचं या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. पक्षाच्या आमदारांच्या सह्या या महाविकासआघाडीच्या सरकारसाठी घेतल्या होत्या पण त्याचा गैरवापर केला गेला असल्याचंही पवार पुढे म्हणाले.

पक्ष सोडून गेलेल्यांसाठी पक्षाचे दरवाजे आता बंद असून पुन्हा निवडणूक लागल्यास आम्ही तीन पक्ष एकत्र मिळून भाजप आणि अजितला धडा शिकवू अशी तंबी शरद पवारांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment