शरद पवारांचा कोकण दौरा अचानक रद्द! सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली वाढल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसताना जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या भूमिकेकडे शेवटपर्यंत सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं पहायला मिळतंय. कराड दौऱ्यावर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोकण दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांनी आपला कोकण दौरा अचानक रद्द केला असून कोकणातील शेतकरी भात काढणीत व्यस्त असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान आज कराडमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चांगलीच खलबतं सुरू असल्याचं पहायला मिळालं. त्यानंतरच पवारांनी कोकण दौरा रद्द करत असल्याचं सांगितलं.

Leave a Comment