शरद पवारांनी दिली माध्यमांना तंबी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्तानाट्य घरोघरी पोहचवण्यात माध्यमांमध्ये चढाओढ चालू असताना शरद पवार यांनी माध्यमांना आज तंबी दिली. आज काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील पहिलीच बैठक रद्द झाल्याचे वृत्त माध्यमांत सुरु आहे. त्यातच अजित पवार यांना याबाबत विचारणा करण्यासाठी माध्यमांनी घेरले असता मला काही माहित नाही असे सांगत शरद पवार यांच्या घरातून ते तडका-फडकी गाडीत बसून निघून गेले.

त्यामुळे आघाडीत सर्व काही ठीक नसल्याच्या संकेतावरून माध्यमांनी शरद पवार यांना याबाबत विचारणा केल्यावर शरद पवार यांनी माध्यमांना खडे बोल सुनावले. तुम्ही चुकीच्या बातम्या देऊ नका. अजित पवार बारामतीहून आजच मुंबईत आले आहेत. तेव्हा त्यांनी मस्करीत काही म्हटले असेल तर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका. ते उद्या तुम्हाला भेटतीलच तेव्हा तुम्ही चुकीच्या बातम्या देत असाल तर यापुढे मी तुम्हाला प्रतिक्रिया देणं टाळेल असं म्हणत त्यांनी माध्यमांना फटकारलं. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नका धीर धरा असा सल्लाही त्यांनी दिला. काही तरी प्रायव्हसी असते सर्वाचं काही सांगता येत नाही. असच चालू राहलं तर मी आता बोलणार नाही तुम्हाला जे वाटतं ते लिहा. मी बघतोच ही बातमी उद्या तुम्ही कशी देता असं पवार म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व काही ठीक आहे. चर्चा सुरु आहेत. म्हणून तुम्ही आक्रस्ताळेपणा करू नका असे सांगत पवार आपल्या मुंबईस्थित घरात निघून गेले.

मात्र, शरद पवार यांना विचारलेला प्रश्न आणि अजित पवार यांचे तडका-फडकी निघून जाणे अनेक प्रश्नांना तोंड फोडले आहे. तर तिकडे आघाडीची बैठक रद्द झाल्याबद्दल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अजून अनेक बैठका होणार आहेत. तुम्ही एक बैठक रद्द झाल्याचे चुकीचे संकेत घेऊ नका. आजची भेट उद्या होईल अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्यात आता ट्विस्ट आला आहे.

Leave a Comment