आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई, शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेली ४ महिने महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळून पाहणाऱ्या आणि त्या परिस्थितीशी झुंजायला राज्यातील कोविड योध्यांना प्रेरणा देणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचं – शारदा टोपे यांचं आज, शनिवारी रात्री उशिरा निधन झालं आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ ऑगस्ट, रविवार रोजी पार्थपूर, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना संकट सुरु झालं तेव्हापासूनच त्या त्यांच्या शारीरिक व्याधींशी झुंज देत होत्या. मधील काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. आज मात्र त्यांची जीवनासोबत सुरु असलेली झुंज संपली. शारदाताई या राष्ट्रवादीचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आघात असल्याच्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही ट्विट करुन या प्रसंगाची माहिती दिली आहे.

Leave a Comment