वर्धापन दिनी मुख्यमंत्री शिवसेनेला देणार ‘हि’ खुशखबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात सांयकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने आमंत्रित केले आहे. आज पर्यतच्या शिवसेनेच्या इतिहासात पक्षा बाहेरील व्यक्तीला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कधीच आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र या वर्धापन दिनी शिवसेनेने हा मान देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मागील काळापासून विधी मंडळाच्या विधान परिषदेचे उप सभापती पद रिक्त आहे. या पदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नेहमी करण्यात येते. तर भाजपकडे या पदासाठी शिवसेनेने दावा देखील सांगितला आहे. त्यामुळे शिवसेनेला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री या पदाबाबत त्यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाऊन सूचक भाष्य करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसात विधान परिषदेचे उप सभापती पद शिवसेनेला दिले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापतीवर कडाडून टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना बोलण्यासाठी रामराजे कमी वेळ देतात. रामराजे निपक्ष निभावण्याच्या पदावर बसून पक्षपात करतात असे चंद्रकांत म्हणाले आहेत. त्यामुळे अधिवेशन काळातच रामराजे निंबाळकर यांच्यावर अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आघाडीचे विधान परिषदेतील संख्याबळ घाटल्याने सभापती अविश्वासाच्या ठरावाने पद्छुत होऊ शकतात.

Leave a Comment