सातारा लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेची ‘ही’ आहे भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी| सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. घोषणेनंतर शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र शिवसेनेने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत घोषित झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपची निवडणुकीच्या संदर्भाने लगबग सुरु झाली आहे. तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढलेले नरेंद्र पाटील यांनी तर हि जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेचा यावर दावा असणारच असे विधान केले होते. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना या संदर्भात विचारणा केली असताना त्यांनी यावर विस्तृत उत्तर दिले आहे.

सध्या युतीची बोलणी सुरु आहेत. युतीत जरी हि जागा आमच्याकडे असली तरी देखील विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे भाजप मध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत शिवसेना संपूर्ण सहकार्य करेल. तसेच सातारच्या बदल्यात कोणती जागा घ्यायची यासंदर्भात २०२४च्या निवडणुकीच्यावेळी बघू असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी लढणार नाही, उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

शिवेंद्रराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने केला हा मास्टर प्लॅन ; भाजपमधून केला जाणार उमेदवार आयात

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

Leave a Comment