ईडीची कारवाई कशासाठी याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, कायदेशीर लढाई लढणार – प्रताप सरनाईक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

खरं तर प्रताप सरनाईक हे भारताबाहेर नव्हते. ते मुंबईतच होते. मात्र ते नेमके कुठे होते, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. ईडीने कारवाई केल्यानंतर सर्व अंदाज घेतल्यावरच त्यांनी प्रभादेवी येथील ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यावेळी काय चर्चा झाली याचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने आज छापे मारले. त्यानंतर सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली.ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment