‘महाविकासआघाडी’च्या सरकार स्थापनेसाठी 164 आमदारांचे राज्यपालांना सह्यांनिशी पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरणार असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, अशी मागणी आज महाविकासआघाडी तर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. महाविकासआघाडीच्या सरकारसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या एकूण १६४ आमदारांचे सह्यांनिशी पत्र राज्यपालांना सादर करण्यात आले.

सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला राज्यपालांनी बोलवावे अशी या पत्रात विनंती करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे उपस्तिथ होते.

बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्येहून अधिक आमदारांच्या सह्यानिशी या पत्रात विनंती करण्यात आली आहे. तर राजधानी दिल्लीत महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी होत असून भाजपने बेकायदेशीरपणे सरकार स्थापन केल्याच्या विरोधात कॉंग्रेस खासदारांनी संसदेबाहेर निषेध नोंदवला आहे.

Leave a Comment