‘या’ सुप्रसिद्ध गायिकेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाआहे. मुबंई -नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक वृत्त सध्या मिळत आहे. गीता माळी त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत प्रवास करत होत्या.विजय या अपघातात किरकोळ जखमी झालेअसून शहापूर रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

Untitled design - 2019-11-14T180738.822.jpg

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गायिका गीता माळी आपले पती विजय यांच्या सोबत आपल्या गाडीने मुंबई येथून नाशिककडे परतत होत्या. दरम्यान कासारा-शहापूर त्यांच्या गाडीला टँकरने धडक दिल्याने गीता यांना गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायिका गीता माळी यांनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले होते. २०१४ मध्ये अमेरिकेमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले होते. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियातही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. २०१९ च्या नववर्षाचा भव्य दिव्य कार्यक्रम दुबई मध्ये झाला होता.

Leave a Comment