केजरीवाल आणि स्मृती इराणी यांच्यात ट्विटर वॉर! स्मृती इराणींनी केजरीवाल यांना म्हटलं #महिलाविरोधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीवर पुढील पाच वर्ष कोण राज्य करणार, दिल्लीचे भविष्य काय असेल याबाबतचा निर्णय नोंदवण्यास राजधानीच्या मतदारांनी आज (शनिवार) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 साठी मतदानास प्रारंभ झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासमवेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले होते. दरम्यान, मतदानापूर्वी केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटवर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लिहले होत, ”सर्वानी मतदान जरूर करा, सर्व महिलांना माझं विशेष आवाहन आहे- तुम्ही ज्याप्रमाणे घराची जबाबदारी पार पाडता त्याचप्रमाणे देशाची आणि दिल्लीचीही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.” तुम्ही सर्व स्त्रिया मतदान करायला जा आणि आपल्या घरातील पुरुषांनाही मतदान करायला सोबत घेऊन जा. तसेच कोणाला मतदान करणे योग्य ठरेल याबाबत पुरुषांशी चर्चा जरूर करा”

केजरीवाल यांच्या या ट्विटवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री केजरीवाल हे ‘महिलाविरोधी’ असल्याचं म्हटलं आहे. स्मृती इराणी ट्विटवर लिहितात, ‘तुम्ही महिलांना इतके दुबळं समजता का? कि त्या कोणाला मतदान करायचे हे सुद्धा ठरवू शकत नाहीत! ‘# महिला केजरीवालविरोधी.’

यांवर केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रत्युत्तर देत ट्विट केले की, ‘स्मृती जी, दिल्लीच्या महिलांनी कोणाला मत द्यायचे हेआधीच ठरविले आहे. तसेच यावेळी संपूर्ण दिल्लीमध्ये महिलांनीच कुटुंबाने कोणाला मतदान करायचे आहे याचा निर्णय घेतला आहे. शेवटी घर त्यांनाच चालवावं लागत.” यानंतर स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांना ट्विटवर उत्तर दिले आणि लिहिले की, ‘ जो सल्ला तुम्ही महिलांना दिला आहे असा सल्ला तुम्ही ट्विट करून आज किती पुरुषांना दिला आहे?”

अरविंद केजरीवाल यांनी स्मृती इराणी यांच्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘माझे म्हणणे असे होते की स्त्रिया घर कसे चालतात हे माहित आहे. मी असेही लिहिले आहे की महिलांनी घरातील पुरुषांना मतदान करण्यासाठी घेऊन जावे. त्यांच्याशी चर्चा करावी.” मनोज तिवारी यांच्या मंदिराला अपवित्र केल्याच्या आरोपावर ते म्हणाले, ”’माझे शूज असे आहेत की त्यांना हात लावून काढण्याची गरज नाही. तेव्हा माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध कसे होईल? भगवंता भाजपा नेत्यांना सदबुद्दी दे!”

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment