सोनाली कुलकर्णी म्हणतीय “जवाब दो”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | डाॅ नरेंन्द्र दाभोळकर यांच्या हत्येला येत्या २० आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पोलीस प्रशासनाला अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही. यापार्श्वभुमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये सोनाली कुलकर्णी शासन यंत्रणेला #WhoKilledDabholkar असा प्रश्न विचारत जवाब दो असे म्हणताना दिसत आहे.

इतर महत्वाचे लेख –

डाॅ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष उलटली तरी खून्यांचा पत्ता नाही, नेटीझम्स मधे संताप

सनातनच्या कार्यकर्त्यांच्या घरात पोलीसांचा छापा, स्फोटके जप्त

तसेच आपण गेली सोळा वर्ष डाॅ दाभोळकरांसोबत अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम केल्याचं तिनं व्हिडीओत म्हटलं आहे. यंदा २० आॅगस्ट ला डाॅ दाभोळकरांच्या हत्येला ५ वर्ष पुर्ण होतायत. गेल्या पाच वर्षात दाभोळकरांचा खून कोणी केला? तो का झाला? हे विचारण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्याबद्दल चीड व्यक्त केलेली आहे. परंतू आज तागायत त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत असंही कुलकर्नणी यांनी सदर व्हिडीओत म्हटले आहे. आजच्या घडीला आपल्या देशात अद्धश्रद्धेपायी कितीतरी गुन्हे घडतायत. कितीतरी हत्या होतायत, महिलांचं बालकांचं शोषण होतंय? आणि ते सारं थांबवायचं असेल तर डाॅ नरेंन्द्र दाभोळकरांचा खूप कोणी केला याचं उत्तर शोधनं महत्वाचं आहे असे सोनालीने म्हणले आहे. हे प्रश्न विचारण्या अापल्याला हक्क आहे आणि त्याची उत्तर शोधण्याचा ही आपला अधिकार आहे असंही सोनालीने सदरील व्हिडिओत म्हटले आहे.

डाॅ दाभोळकरांच्या खून्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याबद्दल चीड व्यक्त होत असताना दिसत आहे. नेटकरी ट्विटर आणि फेसबूकवर #JawabDo आणि #WhoKilledDabholkar असे हॅशटेग वापरुन आपला निषेध नोंदवत आहेत.

[youtube https://www.youtube.com/watch?v=tyBJmPFGIjc&w=560&h=315]

Leave a Comment