‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील कामगारांसाठी हिरो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील स्थलांतरित कामगारांची अवस्था आपण पाहतच आहोत. सर्वोतोपरी केवळ आपल्या घरी पोहोचण्यासाठी हा स्थलांतरित कामगार वर्ग धडपडतो आहे. सरकारकडून एखादी कृती होईल आणि आपल्याला घरी पोहोचता येईल या आशेचे जवळपास निराशेत रूपांतर होत असतानाच श्रमिक रेल्वेची सोय करण्यात आली मात्र सर्वांपर्यन्त ती सुविधा पोहोचली नाही. असे अनेक कामगार आहेत जे अद्यापही घरी जाण्यासाठी धडपडत आहेत. अनेक दानशूर लोक आपापल्या परीने या लोकांना अन्न, पाणी पुरविण्याच्या पद्धतीने मदत करत आहेत. पण या सर्वांमध्ये दबंग सिनेमाचा खलनायक मात्र सर्वांसाठी नायक म्हणून आदर्श बनला आहे. अर्थातच अभिनेता सोनू सूद हा आता या कामगारांसाठी एक आशेचा किरण बनला आहे. कर्नाटक मध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या कामगारांना निरोप देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विविध क्षेत्रातील लोकांसहित अनेकांनी त्यांचे कोतुक आणि अभिनंदन केले आहे. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओ मुळे अनेक ठिकाणचे स्थलांतरित कामगार सोनू सूद यांना संपर्क करू पाहत आहेत. सोशल मीडियावर त्यांना तुम्हीच आमची शेवटची आशा असल्याचे सांगत मदतीसाठी आर्जव करत आहेत. या लोकांना सर्व बाजूनी मदतीचे आश्वासन देत मी तुमच्या सोबत आहे असेही सोनू सूद यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. नुकतेच त्यांनी आपण घरी बसून कंटाळलो आहोत आणि काही असे लोक आहेत जे घरी पोहोचण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने त्यांची या कामगारांप्रती असणारी आस्था पाहून विविध ठिकाणांहून लोक त्यांना मदतीसाठी विनंती करत आहेत.

सगळीकडून कौतुक होत असताना “मी माझे कर्तव्य बजावत आहे” असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a Comment