विनोद तावडेंना पंढरपूरच्या विद्यार्थ्याचं झणझणीत खुले पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | “ऐपत नसेल तर शिकू नको नोकरी कर” असे वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना सोलापूरच्या एका विद्यार्थ्याने खुले पत्र लिहिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरून सत्तेच्या धुंदीत आणि एसी ची हवा कानात गेल्यामुळे तावडे वाट्टेल ते बोलत आहेत असे म्हणून सदर विद्यार्थ्याने तावडे यांना पत्रातून जाब विचारला आहे. पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे.

नमस्कार
प्रति,शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब.

परवाचं तुमचं विध्यार्थ्यांना उर्मठ बोलणं ऐकून फक्त विनोद तावडे अस म्हणणार होतो पण तुम्हाला तुम्ही शिक्षणमंत्री आहात याची आठवण करून द्यावी म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब अस म्हणतोय…

अमरावती येथे शिवाजी महाविद्यालयात आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतात.कार्यक्रम सम्पल्यानंतर तिथल्याच काही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी आपणाला गराडा घातला.,पण आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.शिक्षणमंत्री असूनही तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा काय महत्वाचं वाटलं देव जाणे?पण तरीही त्यातल्या एका विद्यार्थ्यांने तुम्हाला प्रश्न विचारलाच अन तो खूप चुकीचा होता,संतापजनक होता असं तुम्हाला वाटलं असेल कदाचित म्हणूनच त्यादिवशी तुमचा पारा चढला असावा.त्या विद्यार्थ्याने अस विचारलं की, “सर,आपल्या महाराष्ट्रात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत आहे,पण उचमाध्यमिक शिक्षण पण मोफत होईल का”? काय चुकलं सांगा.तुम्ही यावर उत्तर दिलं की,”ऐपत नसेल तर शिकू नको,नोकरी कर.” हे समाधानकारक उत्तर मुळीच नव्हतं म्हणून तो विध्यार्थी म्हणाला ,”सर,पण मला उच्चशिक्षण घ्यायचंय.!!! मग काय जिथं नको तिथं तुम्हाला तुमचं मंत्रीपद आठवलं…मी मंत्री आहे आणि हे पोरगं मला उलट कस काय बोलतंय??? तुमचा इगो काही कारण नसताना हर्ट झाला…आणि तुम्ही त्याला उर्मठपणे बोललात,”माझ्याबरोबर मोठ्या आवाजात बोलायचं नाही.”
मग तुमच्या लक्षात आलं की काही विध्यार्थी मोबाइलवर शूटिंग करतायेत…मग काय तुम्ही आदेश दिले यांना अटक करा,मोबाइलला जप्त करा.व्हिडिओ डीलेट करा…..

साहेब, हे करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही..सत्तासुंदरीने एवढी कसली भुरळ पडलीय तुमच्यावर?? का आम्हा विद्यार्थ्यांनी खुर्चीचा माज समजावा का? आज एवढे मोठे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आ वासून उभे आहेत,मोठं मोठ्या डीगऱ्या घेऊनही आठ-दहा हजारावर चाकरी करावी लागतेय,कारण घरचा तोट्यातला शेती व्यवसाय हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मिळेल तिथे नोकरी करावीच लागते.कारण तुम्ही शिक्षणातसुद्धा राजकारण आणलंय… जागा रिक्त असतानादेखील भरती काढायची नाही आणि काढलीच तर ती तुटपुंज्या जागांसाठी काढायची…मोठं मोठी आश्वासनं देऊन शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या पोराला दोघांनाही फक्त झुलवत ठेवायचं…

परवा पुण्यात आर्मी भरती झाली.देशभरातून विध्यार्थी भरती होण्यासाठी आले होते.विद्यार्थ्यांची संख्या होती वीस हजार आणि जागा किती होत्या तर फक्त 104….
एवढ्या कड्याक्याच्या थंडीत देशाचं भविष्य म्हणवले जाणारे विध्यार्थी युवक फुटपाथवर झोपले होते..,ना राहण्याची सोय ना खाण्याची..पण हे बघायला तुमच्याकडे वेळ कुठं आहे.फक्त नवनवीन योजना व अवास्थव तोंड वासून केलेल्या घोषणा…..
लक्षात असुद्या तावडे साहेब आम्ही विद्यार्थीही मतदार आहोत किव्वा भविष्यात मतदार होणार आहोत.तुमच्या या वाचाळतेच बक्षीस तुम्हाला येत्या काळात नक्की देऊ तेही लक्षात ठेवून…

तुमचा या प्रकरणानंतर ठिकठिकाणी निषेध झाला.विद्यार्थ्यांनी तुम्हाला जाब विचारला असता तुम्ही,” मी अस बोललोच नव्हतो,”व्हिडिओ असेल तर दाखवा मी जाहीर माफी मागतो.”अस बोललात…अहो तावडे साहेब,मोबाइल तुम्हीच जप्त केले,विध्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश तुम्हीच दिले,अहो,जनाची लाज तुम्हाला नाहीच पण मनाची तरी…असो,.
पालकाने मुलाला दिशा दाखवण्याचं काम करायचं असत.आम्ही विध्यार्थी आहोत आम्ही तुमच्याकडे पालक म्हणून बघतोय पण तुम्हीच जर असे वागलात तर आम्हाला आमचे पालनकर्ते बदलावे लागतील आणि तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचून तुम्हाला एका कोपऱ्यात बसवावं लागेल आणि तो हक्क आमच्याकडे आहे आणि तो मतपेटीतून आम्ही तुम्हाला नक्की दाखवून देऊ….!!

छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पवित्र ग्रंथात ‘मंत्री कसा असावा’ हे खूप छान आणि मार्मिक शब्दात मांडलेलं आहे तरी आपण ते वाचावं किंवा वेळ नसेल तर बघावं आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा…तुम्हाला महापुरुषांच्या विचारांचा लवलेश जरी नसला तरी तुम्ही त्यांचीच नावं घेऊन लोकांच्या भावणीकतेवर आघात करून सत्तेवर आलात हे विसरून चालणार नाही….

आणि राहिला विषय तुमच्या तोंडाचा ताबा सुटल्याचा,,तरीही काळजी नसावी मंत्रीमहोदय माझ्याजवळ त्याचाही उपाय आहे.आम्ही विध्यार्थी मिळून वर्गणी काढून तुम्हाला सोन्याची लगाम घेऊन देऊन देऊ..शिक्षणमंत्री म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य विसरला असाल पण आम्ही विध्यार्थी विसरलो नाही…आणि हे करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो…
लगाम दीखती नही है पर मूहपर होणी चाहीये….हे तुम्ही विसरलात म्हणून हा सर्व खटाटोप.

धन्यवाद…

n

आपलाच एक विध्यार्थी
अजिंक्य विजयकुमार नागटिळक
(7350853975)
मु.पो.सुस्ते ता.पंढरपूर जि. सोलापूर

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी

‘एक वेळ हिजड्याला मुलं होतील’ असं म्हणणार्या नितिन गडकरींना दिशा शेख यांचं खूलं पत्र

इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?

Leave a Comment