अचानक लागलेल्या आगीत मुलाचा गुदमरून मृत्यू ; तिघांची प्रकृती चिंताजनक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । इमारतीच्या खालच्या मजल्याला आग लागली. त्यामुळे घराबाहेर निघता न आल्याने धुरामुळे गुदमरून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहरातील उल्कानगरी भागात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संस्कार शामसुंदर जाधव वय-14 असे मृत मुलाचे नाव आहे. तर शामसुंदर जाधव, सविता जाधव, मुलगी संस्कृती जाधव अशी उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे आहे.त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील शामसुंदर जाधव यांचा एलईडी व सोलार उर्जाच्या उपकरण विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या एक वर्षांपुर्वी अविनाश पाठक यांच्या सहा खोल्यांच्या बंगल्यात जाधव कुटुंबिय भाड्याने राहते. बुधवारी रात्री कुटुंबिय झोपी गेलेले असताना शॉर्टसर्किटमुळे घराच्या पाठीमागील खोलीत अचानक आग लागली. या आगीत एलईडी बल्ब आणि सोलार उर्जाच्या उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात आणि घरात धुराचे लोळ पसरले. धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी दुस-या मजल्यावर धाव घेतली. धुरापासून बचाव करण्यासाठी दुस-या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता.

शॉर्टसर्किटमुळे घरातील विज पुरवठा खंडीत झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकुण पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणा-या कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलीसांना कळविण्यात आली. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील बाळगोपाळांसह नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल दाखल झाल्यावर जाधव कुटुंबियांच्या बचावासाठी दुस-या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडला. तोपर्यंत जाधव कुटुंबिय बेशुध्द पडलेले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांना तात्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुकल्या संस्कारचा तोपर्यंत गुदमरुन मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Comment