सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

राम मोरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी गावचा रहिवासी आहे. रामाने एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. तसेच त्या कर्जाची परतफेड केली होती. मात्र सावकार रामकडे पुन्हा पैसे मागत होता.

त्यामुळे रामने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्याकडे लक्ष न दिल्याने रामने अखेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांकडे वारंवार तक्रार करुनही पोलीसांनी तक्रार दाखल न केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

Leave a Comment