कणखरपणा मधील मायाळूपणा हरपला ; सुषमा स्वराज यांचे दुखःद निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । उत्तम संसदपटू , राजकारणाच्या पटलावर विरोधी गटाला सहजतेने किंव्हा आक्रमकतेने नामोहरण करणाऱ्या, उत्तम वक्त्या असा त्रिवेणी संगम असलेल्या आपल्या देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री हृदयविकाराच्य झटक्याने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.

आपल्या वकृत्त्व-कर्तुत्व- नेतृत्व कार्याच्या बळावर समस्त भारतीयांच्या मनामनात त्या घर करून गेल्यात. विरोधी पक्षात असतांना जनतेच्या मुद्द्यावरची आक्रमकता त्यांची वाखाणण्याजोगी होती. देशाप्रती असणारे त्यांचे प्रेम आणि परदेशात असणाऱ्या भारतीयांना असणारा त्यांचा आधार त्यांच्या कार्यातून नेहमी दिसला आहे.

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, पंतप्रधान म्हणून भाजपकडे आज तरी हुशार, ब्रिलियंट अशीच एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे सुषमा स्वराज. बीजेपी मधील त्या एकमेव नेत्या असतील की ज्यांचा द्वेष विरोधकांनीही कधी केला नसेल व त्यांच्यावर कधी अन्य पातळीवर जाऊन टिका देखिल केली नसेल. म्हणून सर्व देशातील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी व विरोधकांसाठी सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी क्लेशदायक आहे.

Leave a Comment