‘त्या’ कागदपत्रांवर रितेश देशमुखने केला ट्विटर द्वारे खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचे काही कागदपत्रे सोशल मिडीया वर चांगलेच व्हायरल झाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी कागदपत्रांचे फोटो शेअर करत ”चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्ज माफ करून घेतले असल्या”चे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांना याबाबत खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले आहे. त्यांनी ट्विट करत या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. याबाबत त्यांनी ”सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात आहेत. मी व अमितने कोणतेच कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कोणत्याही कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका,’’ असे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. सध्या रितेश यांच्या ट्विटमुळे मधू किश्वर यांनी आपले ट्विट डिलीट केले. मात्र या प्रकरणावर सोशल मीडिया वर जोरदार चर्चा झाली.

 

Leave a Comment