काका-बाबा गटाचा टोकाचा संघर्ष संपणार, काँग्रेसला जिल्ह्यात बळकटी होण्यास मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड

कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार चव्हाण आणि उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच 35 वर्षे सलग माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे या मतदार संघाचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुक लढवली. त्यामध्ये चव्हाण हे विजयी होवुन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.

राजकीय संघर्षातुन चव्हाण आणि उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस पहायला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातुन विलासराव पाटील-उंडाळकर हे बाजुला होवुन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामाध्यमातुन त्यांनी कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार म्हणुन नेतृत्व करत असतानाच त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणुन काम पहत होते. त्यामुळे ते दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते.

त्यानंतर मध्यंतरी आमदार चव्हाण व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर नुकतीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री थोरात, आमदार चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व माझी मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये काही चर्चा झाल्या. मी कोणतीही डिमांड केलेली नाही, मात्र पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी तयार आहे असे उदयसिंग उंडाळकर म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बंटी पाटील व उंडाळकर यांच्या उपस्थितीत कराडला पुढील आठवड्यात होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही गट एकत्र आल्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होईल

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment