धक्कादायक! सॅनिटायझर लावताच चेहरा झाला लालबुंद; हृदयाचे ठोके वाढल्याने दवाखान्यात भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
मुंबई । सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वाना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. संसर्गापासून दूर राहण्यासाठी सॅनिटाझर लावून निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जाते आहे. मात्र, सॅनिटाझरचा अतिवापर हानीकारक ठरत असल्याचेही दिसून येते आहे. अंधेरीत एका व्यक्तिने सॅनिटायझरचा वापर करताच काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका ४३ वर्षीय व्यक्तिच्या बाबतीत ही घटना घडली आहे.
या व्यक्तिला दारूची लत असून दारू सोडण्यासाठी तो गेल्या तीन वर्षांपासून औषधे घेतो आहे. बँकेच्या कामानिमित्त तो बँकेत गेला होता. यावेळी नियमानुसार त्याला हाताला सॅनिटायझर लावावे लागले. अल्कहोलयुक्त सॅनिटाझर हाताला लावल्याने काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि हृदयाचे ठोके वाढले. त्यामुळे त्याला लगेचच अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असता प्रति मिनिटाला त्याचे हार्टरेट १०२-१०३ बीट्स असल्याचं आढळून आले. डॉक्टरांनी त्याला अँटीऍलर्जीक देऊन त्याचा ईसीजीही काढला. त्यानंतर तासाभरातच त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य झाले.
ही व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून दारू सोडण्यासाठी उपचार घेत असल्यामुळे त्याला अल्कोहोलची मात्रा असलेल्या सॅनिटाझरचा वापर केल्याने डाइसल्फीरमची रिऍक्शन झाल्याचे आढळून आले.  या व्यक्तिला गेल्या दहा वर्षापासून दारू पिण्याची सवय होती, असे सूत्रांनी सांगितले. या व्यक्तिला दारू सोडण्यसााठी डाइसल्फीरम औषध दिलंले जात होते. मात्र, सॅनिटाझरमुळे रिऍक्शन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे  डॉ म्हणाले.
विशेष म्हणजे या घटनेचा उल्लेख ऑक्सफर्ड जर्नलच्या अल्कोहोल अँड अल्कोहोलिझ्मच्या जुलैच्या अंकात करण्यात आला आहे. या घटनेमुळे सॅनिटाझर इथेनॉलला शोषून घेत असल्याचं सिद्ध झाले आहे. तसेच सॅनिटाझरचा वापर केल्याने अल्कोहोलिक व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, हे सुद्धा उघड झाले आहे.

Leave a Comment