२० वर्षांच्या अपेक्षांचं ओझं उतरवून देशाच्या खांद्यावर विराजमान झालेला सगळ्यात महत्त्वाचा क्षण..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पूर्ण जग ओळखतं अशा या विक्रमादित्याच्या आठवणीही तितक्याच रंजक आणि रोमांचकारी आहेत. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम मागील ८ वर्षांहून अधिक काळ स्वतःच्या नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरची आणखी एक आठवण लॉरेस स्पोर्टने आज लोकांच्या समोर आणली आहे.

२००१ ते २०२० या कालावधीतील सगळ्यांत प्रेरणादायी आणि खिलाडुवृत्ती दाखवणारा भावनिक क्षण असं या प्रसंगाचं वर्णन लॉरेसने केलं आहे. तब्बल ६ विश्वचषक स्पर्धा खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरचं संघाला विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न पूर्ण झालं. १९९१ ते २०११ या २० वर्षांच्या कालावधीत देशवासीयांच्या अपेक्षा डोक्यावर घेत सचिन खेळत राहिला आणि २०११ साली ही अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर देशाच्या युवा क्रिकेटपटूंनी सचिनला खांद्यावर घेत हा आनंद साजरा केला असं वर्णन अलटीमेट स्पोर्टिंग अवॉर्ड देताना लॉरेसने केलं.

२००० ते २०२० या २० वर्षांच्या कालावधीतील सगळ्यांत महत्वाचा क्षण म्हणून या क्षणाला गौरवण्यात आलं आहे. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची किमया केली होती.

 

Leave a Comment