अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पार, न्यूयॉर्क बनणार दुसरे वुहान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्यापर्यंत चीनमधील वुहान हे कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होते. या महिन्यात युरोपियन देश इटली कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता जगातील सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनामुळे विनाशाची वेळ आली आहे. अमेरिकेत कोरोना बाधित रूग्णांची संख्येने ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. एका दिवसातच तेथे १० हजाराहून अधिक रुग्ण दिसले आहेत.एकीकडे,आपल्या संपूर्ण देशात ५०० कोरोनाने संक्रमित रूग्ण आढळून देखील भारताने २१ दिवस लॉकडाउन घोषित केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प ५५ हजार रुग्णानंतरही आपला देश बंद करण्यास तयार नाहीत. ट्रम्प यांच्या चुकीमुळे न्यूयॉर्क दुसरा इटली तर होणार नाही ना अशी भीती व्यक्त होते आहे.

कोरोना संक्रमित ५०० रुग्णांसाठी २१ दिवस भारत लॉकडाउन
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा केली, त्याच दिवशी अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या अचानक १० हजारांनी वाढली. अमेरिकेत एका दिवसात कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत ही सर्वात मोठी वाढ आहे.

५५ हजारांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्णांसह अमेरिका जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मंगळवारी अमेरिकेत १०,००० नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे एका दिवसात दीडशे लोकांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू हा अमेरिकेवरील सर्वात मोठा हल्ला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश सध्या गंभीर संकटात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अमेरिकेला कोरोनापासून होणाऱ्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की अमेरिका कोरोना विषाणूचे नवीन केंद्र बनत आहे. डब्ल्यूएचओचा धोका असूनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आशा आहे की या गंभीर धमकीचा सामना आपण सहजपणे करू. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्डट्रम्प यांनी जाहीर केले आहे की ते संपूर्ण अमेरिकेला लॉकडाउन करणार नाही.

५५ हजार रुग्णानंतरही अमेरिकेत लॉकडाउन नाही
वास्तविक डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या देशाच्या अर्थकारणाची चिंता आहे. ट्रम्प यांनी कबूल केले आहे की बरेच छोटे व्यापारी आणि नोकऱ्या बंद पडल्यास त्यांचा नाश होईल, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या प्रसाराची गती पहायला हवी, जेणेकरुन कोरोनाचा गंभीर धोका ट्रम्प यांना समजू शकेल. २० जानेवारी रोजी अमेरिकेत कोरोना विषाणूची पहिली घटना उघडकीस आली. ४५ दिवसांनंतर ४ मार्च रोजी अमेरिकेत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या १०० वर पोहोचली.१० दिवसांनंतर,१३ मार्च रोजी अमेरिकेत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या१००० पर्यंत वाढली.७ दिवसांनंतर,१९ मार्च रोजी अमेरिकेत रूग्णांची संख्या १० पट वाढून १०हजार झाली.६ दिवसांनंतर २४ मार्चपर्यंत अमेरिकेत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ५०हजारांवर गेली.

न्यूयॉर्क आणखी एक वुहान होऊ नये?
अमेरिकेतील सर्वात मोठे शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क ही अमेरिकेची आर्थिक राजधानी देखील आहे, परंतु न्यूयॉर्क हे अमेरिकेतील कोरोना विषाणूचे सर्वात मोठे केंद्र बनत आहे. केवळ न्यूयॉर्कमध्येच, २५,००० हून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर २१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. ट्रम्प यांचा आग्रह आहे की ते अमेरिकेत लॉकडाउन करणार नाही, परंतु हा प्रश्न आहे कि अमेरिकेच्या ३३ दशलक्ष लोकसंख्येचा जीव धोक्यात घालून देशाची अर्थव्यवस्था वाचवता येईल ?

Leave a Comment