करोनाबाधित मृतकाच्या पत्नी-मुलाला करोनाची लागण; अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आता खबरदारी म्हणून या दोघांनाही अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारण्यात आल्याचे समजते. दोघांनीही विलगीकरण कक्षामध्येच त्याचे अंतिम दर्शन घेतले. संसर्ग पसरू नये, यासाठी मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह विशिष्ट वैद्यकीय आवरणाने झाकण्यात आला.

संसर्ग पसरू नये, यासाठी डॉक्टरांनाही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. खासगी रुग्णालयांमध्येही करोना संशयित रुग्णांना निःशुल्क सेवा तसेच वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भात पालिकेने चर्चा केली आहे. मात्र या रुग्णालयांनी ही सुविध मोफत द्यावी, असे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment