Tik Tok ला फाईट देण्यासाठी गुगल आणणार ‘हे’ अॅप

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Techमित्र | भारतात नेटीजन्समध्ये टिक-टॉक खूप लोकप्रिय असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढते आहे. टिक-टॉकच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या स्पर्धकांना काळजी वाटायला लागली आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo च्या पण फायरवर्क खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू आहे. या व्यवहारात गुगल इतर कंपन्यांच्या बरीच पुढे आहे.

मागच्याच महिन्यात ‘फायरवर्क’ भारतात आले आहे. फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा झाला आहे. तर, टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं ७५ मिलियन डॉलरची आहे.

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले हे अॅप टिकटॉकपेक्षा वेगळं आहे. फायरवर्क युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो. टिकटॉकमध्ये फक्त १५ सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो. तसंच, युजर्स व्हर्टिकल व्हिडिओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडिओसुद्धा शूट करू शकतो. फायरवर्क अँड्रोइड आणि आयओएसला वापरता येते. याच्या युजर्सची संख्या १० लाखांपेक्षा जास्त आहे.

सोशल मीडिया कंपनी फेसबुकनेसुद्धा युजर्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेली क्रेझ पाहून एक नवीन अॅप लाँच केले आहे. नोव्हेंबर २०१८ ला lasso नावाचं एक अॅप फेसबुकनं लाँच केले आहे. फेसबुकचं हे लेटेस्ट अॅप सध्या फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. या अॅपचे फिचर टिकटॉकसारखेच आहेत.

दरम्यान, भारतात टिक टॉक अॅपचा गैरवापर करण्यात येत आहे. टिक टॉक अॅपमध्ये अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याच्या आरोपात अॅपवर बंदी टाकण्यात आली होती. टिक टॉकचे १२ कोटी यूजर्स असून बंदीनंतर या अॅपवरील सुमारे ६० लाख व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने टिक टॉकवरील बंदी हटवली होती.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook