धक्कादायक ! अतिस्वच्छतेला कंटाळून पत्नीची हत्या करुन पतीची ही आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।   कर्नाटकातील म्हैसूर येथे पत्नीच्या अती स्वच्छतेला कंटाळून पतीने तिची हत्या करुन स्वतःही आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.  आत्महत्या केलेल्या पतीचे नाव सत्यमुर्ती असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी असे होते.

मंगळवारी शेतामध्ये काम करतानाच या दोघांमध्ये वाद झाला असता संतापाच्या भरात सत्यमुर्तीने पुट्टमणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. त्यानंतर सत्यमुर्ती घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली तेव्हा त्यांना सत्यमुर्ती घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळून आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सुत्यमुर्ती यांना खाली उतरवलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वांना पुट्टमणीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह शेतामध्ये अढळून आला.

दरम्यान १५ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.  मात्र पुट्टमणी यांना अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ घालायच्या. इतकचं नाही तर त्या घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या असं त्यांचे शेजारी सांगतात. यावरुन झालेल्या वादातून पतीने पुट्टमणी यांची हत्या केल्याचे समजते.

Leave a Comment