उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी | २४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणीसाठी विनापरवाना मोबाईल मतमोजणी केंद्रात नेल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पायाला रुमालाने मोबाईल बांधून हे कार्यकर्ते मतदानकेंद्रात निघाले होते. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. संबंधित पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याशी संपर्क केला असता संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. भाजपचे राणा जगजितसिंह तुळजापूरमधून निवडणूक लढवत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार का केला हे अद्यापही समजू शकलं नाही.

Leave a Comment