श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी

कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्या सदर भेटीमध्ये कराड- पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी आखयची आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. दीड तास चाललेल्या या बैठकीत कराड- पाटण तालुक्यात कोणते आखाडे आखायचे याविषयीही सखोल चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वी सातारा लोकसभेतून उदयनराजे कि श्रीनिवास पाटील अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सदर भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत विजयसिंह यादव, सुनिल काटकर, शिवसेनेचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment