त्या वर्दीवर कोणताही कलंक लागू देऊ नका- उद्धव ठाकरे, पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत संचलनात मार्गदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | आपल्याला मिळालेली वर्दी आपल्या आई वडिलांच्या मेहनतीनंतर आणि आपल्या खडतर प्रशिक्षणानंतर मिळाली आहे. त्या वर्दीवर कोणताही डाग, कलंक लागू देवू नका असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या सत्र क्र. 117 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन पार पडले. गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल या प्रसंगी उपस्थित होते.

मानाच्या तलवारी सोबत मानाची रिव्हॉल्व्हरही देणार

भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी पुढील वर्षी मानाची तलवारबरोबरच मानाची रिव्हालवर पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले की, या अकादमीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल येथील प्रशिक्षण अभ्यासण्यासाठी विदेशातील पोलीस दल येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कार विजया पवार यांना तर मानाची तलवार संतोष कामटे यांना प्रदान करण्यात आली. ‘बेस्ट ऑफ आऊटडोअर स्टडी साठी सागर साबळे, बेस्ट ऑफ इनडोअर स्टडी- संतोष कामटे,सेकंड बेस्ट ट्रेनीसाठी विजया पवार यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment