इराणमध्ये युक्रेनचं विमान दुर्घटनाग्रस्त;१८० प्रवाशांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व १८० प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. युक्रेन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ या विमानाने उड्डाण घेताच ते दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या बोईंग ७३७ विमानाने तेहरानमधील इमाम खोमेईनी विमातनळावरुन उड्डाण केलं होतं. मात्र अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. या विमानात १८० प्रवासी आणि क्रू होता. मागील काही वर्षात ‘बोईंग ७३७’ या प्रकाराच्या विमानांचे अपघात झाले आहेत. ‘बोईंग ७३७’ हे विमान ताफ्यातून कमी करण्याचा विचार काही विमान कंपन्या करत असल्याची चर्चा होती. आज तेहरानमध्ये झालेल्या अपघातानंतर ‘बोईंग ७३७’ च्या सुरक्षितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment