३६ तासांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प आणि मोदींमध्ये ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प हे या प्रवासादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प मोठ्या प्रतिनिधी मंडळासह भारतात येणार अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे कॅबिनेटचे अनेक मंत्रीही या भेटीचा भाग असणार आहेत.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबादला पोचतील. येथील रोड शोनंतर ट्रम्प मोटेरा स्टेडियमवर पोहचतील. मोटेरा येथे आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही संबोधित करतील. मोटेरावर येथे आयोजित केलेला कार्यक्रम हाउडी मोदींच्या धर्तीवर असेल.

या मुद्द्यांवर होणार चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा, प्रादेशिक बाबी या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचा कयास लावला जात आहे. पंतप्रधान ट्रम्प अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी दुपारचे जेवण आयोजित करतील.

8 महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये 5 वी बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मागील 8 महिन्यांतील ही 5 वी बैठक असेल. स्वत: ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते पंतप्रधान मोदींना मी आपला सर्वात चांगला मित्र मानतो. तथापि, आपण आत्ताच भारताशी व्यापार करारावर स्वाक्षरी करणार नाही, असे सांगून त्यांनी भारताचा अपेक्षांभंग केला असून भारतासोबत आपण सध्या कुठलाही व्यापारी करार करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान लवकरच करार होईल अशी भारताकडून अपेक्षा होती. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात भारत व्यापारी करारावर भर जरी देणार नसला तरी, जे काही करार होतील ते दोन्ही देशांसाठी ‘विन विन परिस्थिती’ सारखे असेल.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment