ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संस्थापिका विद्या बाळ यांचं आज निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या वैद्यकीय उपचार घेत होत्या. महिलांना स्वतःची ओळख निर्माण करुन देण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.

स्त्रियांच्या विविध चळवळी चालवत असताना त्यांनी मिळून साऱ्याजनी मासिकातर्फे साहित्याचा आधार घेऊनही स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातही त्या सक्रिय सहभागी होत्या.

Leave a Comment