कर्णधार विराट कोहली टी-२०क्रिकेटमधून संन्यास घेणार? घेतला हा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वात सामन्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळं क्रिकेटपटू प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबावामध्ये आहेत. अगदी भारतीय कर्णधार विराट कोहली देखील याविषयी आधीच बोलला आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे दोन खेळाडू सर्व फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारे कर्णधार आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर नेहमीच दबाव असतो. त्याचबरोबर आयपीएलमुळे त्यांना विश्रांतीचा काळ मिळणं फारच अवघड आहे. आपली कारकीर्द अधिक काळ चालविण्यासाठी जगातील क्रिकेटपटू खेळातील वर्कलोडचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच जाहीर केलं आहे की २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर तो या फॉर्मेटचा निरोप घेणार आहे. दरम्यान भारतीय कर्णधारविराट कोहलीवरील कामाचा ताणही वाढत आहे. त्यामुळं भविष्यात एक फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा कोहलीला विचारले गेले की, २०२१ टी -२० विश्वचषकानंतर आपण एक फॉर्मेट सोडण्याचा विचार करीत आहेस का? असा सवाल विराटला करण्यात आला. त्यावर विराट म्हणाला,”सध्या तरी मी पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्वत:ला तयार करतो आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण दमदार कामगिरी करत राहावी यासाठी मी सध्या केवळ पुढील तीन वर्षांचाच विचार करतो आहे. तीन वर्षानंतर मात्र कदाचित आपण काही वेगळ्या पद्धतीचा संवाद साधू शकतो.”

वयाच्या ३५ वर्षानंतर भविष्याबाबत निर्णय घेणार
सामन्याच्या व्यस्त कार्यक्रमामुळं येणारा थकवा आणि वर्कलोड व्यवस्थापनाच्या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे असंही विराट कोहलीनं म्हटलं. मात्र, यावर त्याने आणखी काही सांगितले नाही. कोहली म्हणाला की, क्रिकेटचा व्यस्त कार्यक्रम ही अशी एक चर्चा आहे जिला आपण कोणत्याही प्रकारे लपवू शकता नाही. तो म्हणाला की, ”मी जवळजवळ ८ वर्षांपासून वर्षातून ३०० दिवस खेळत आहे. ज्यामध्ये प्रवास आणि सराव सत्रांचा समावेश आहे.” विराट कोहलीने कबूल केले की जेव्हा जेव्हा तो ३४ किंवा ३५ वर्षांचा होईल त्यावेळी क्रिकेट खेळताना शारीरिक क्षमता जास्त स्टेज देणार नाही तेव्हा त्यावेळी स्वतंत्र विचार करणार असल्याचे त्यानं सांगितलं. पण पुढील दोन-तीन वर्षे त्याला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळताना कोणतीही अडचण नाही आहे असंही विराट यावेळी म्हणाला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment