आताही फक्त चर्चाच होणार का ? – नितेश राणेंचं शिवसेनेला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई  | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि इतर राजकीय नेते यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहेत.

शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. ‘पेंग्विन आणि नाईट लाईफच्या मुद्याकडे लक्ष देण्यापेक्षा शिवसेना जिवंत माणसांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही लोकांच्या जीवाची किंमत मात्र शून्य असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबईतील इतर दुर्घटनांची जशी चौकशी केली तशी आताही या दुर्घटनेची चौकशी होईल. काही छोटे अधिकारी निलंबित केले जातील. मात्र याबाबतीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जात नाही. ना महापौरांना राजीनामा मागितला जातो. दरवेळी प्रमाणे याहीवेळी फक्त चर्चाच होणार असे अनेक मुद्दे राणेंनी ट्विट करून शिवसेनेला विचारले आहेत .

 

इतर महत्वाचे –

मुंबईत पादचारी पूल कोसळला…

बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू

राष्ट्रावादी कडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Leave a Comment