कराडमध्ये अतिक्रमणाविरोधात महिलादिनीच महिलांचं ‘भीक मांगो’ आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सकलेन मुलाणी

कराडमधील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात महिला विक्रेत्या आक्रमक झाल्या आहेत. शहरामध्ये एका आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अन्याय झाल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे.

महिलादिनादिवशी अनोख्या पद्धतीचं आंदोलन करत महिलांनी पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन संबंधित वस्तुविक्रेत्या महिलांनी भीक मागितली.

या आंदोलनात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता. रविवारी सकाळपासूनच मोर्चेकरी महिलांनी भीक गोळा करण्यासाठी बॉक्स जमा केले होते. शिवाय मोहिमेचा निषेध करणारे फलकही सोबत आणले होते. श्री. चव्हाण यांचे पुतणे व युवा नेते इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हातगाडीधारकांनी त्यांना निवेदनही दिले. अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असल्यापासून दहा दिवस व्यवसाय बंद आहे. महिलांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका हॉकर्स झोनबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी आज भिक मागून आंदोलन केले.

Leave a Comment