ZP Election : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा विजयी; नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला जोरदार धक्का बसला असून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सरकारची सत्ता आली आहे. भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावातील उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची होती.

Leave a Comment