ब्रेकिंग न्युज : नाशिकमध्ये भर रस्त्यावर स्कोडा गाडीमध्ये मनसे नेत्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कामटवाडे येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी सटाणा-साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) (Nandu ganpat shinde) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नंदू शिंदे हे मनसेचे पदाधिकारी होते. तसंच ते महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी देखील होते.

नंदू शिंदे हे आपल्या MH 15 FT 0133 क्रमांकाच्या स्कोडा कारने नाशिककडे जात होते. ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर इथं पोहोचल्यावर त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर आपल्या मावस भावाला फोन केला. ‘मी गाडी चालवण्याच्या मनस्थितीत नाही. मी सटाण्याजवळ असलेल्या जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे’ असं त्यांनी सांगितले. त्यानंतर मावस भाऊ आणि इतर नातेवाईक हे नंदू शिंदे यांच्याकडे पोहोचले पण तोपर्यंत उशीर झाला होता. समोरच्या सीटवर नंदू शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारच्या समोर सीटवरच नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून  आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Leave a Comment