अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा ६८ टक्क्यांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा ६८ टक्क्यांवर येऊन पोहचला आहे .मागील चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील साठा हा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकुण ९० टक्के इतका समाधानकारक साठा झाल्याने आगामी काळातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या ही निकाली निघाली आहे.

मागील तीन दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अमरावती शहराला तसेच वरुड, मोर्शी तालुक्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणासह ,शहानूर चंद्रभागा पूर्णा व सपन या मध्यम प्रकल्पातही दमदार साठा निर्माण झाला आहे.

Leave a Comment