आजारी वृद्ध महिलेला स्ट्रेचरवर चिखलातून पाठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी |बीड जिल्ह्याची ओळख अलीकडच्या काळात दुष्काळी जिल्हा म्हणून झाली आहे. पण दुष्काळ पडणे किंवा न पडणे हि निसर्गाच्या  हातात असलेली बाब आहे. त्यामुळे त्याला काही करता येत नाही. परंतु या भागातील स्थानिक आरोग्य सेवा पुरवणारे घटक तसेच जनसेवा करणारे राजकीय नेते पुढारीच जर कुचकामी आणि बकालपणाचे उदाहरण समोर ठेवत असतील तर येथील व्यवस्थाच किती दुष्काळी आहे हे समजेल. याबाबतची एक उदाहरणवजा धक्कदायक घटना बीडमधून समोर आली आहे. एका 60 वर्षाच्या वृद्ध महिला पेशंटला वैद्यकिय तपासणीसाठी खासगी आरोग्य केंद्रात घेऊन हलवण्यासाठी रुग्णवाहिका न पाठवता चक्क स्ट्रेचर पाठवले गेले. त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या विडिओ मध्ये एका आजारी वृद्ध महिलेला आरोग्य केंद्रात हलवत असताना रुग्णवाहिका न पुरवता महिलेचे नातेवाईक चक्क स्ट्रेचरवरून महिलेला घेऊन जाताना दिसत आहेत.

हा विडिओ आपल्या पांगळ्या झालेल्या आरोग्य व्यवस्थेचे दर्शन घडवून आणतो. ज्या रस्त्याने महिलेचे नातेवाईक स्ट्रेचरवर तिला घेऊन जात जात आहेत तोही धड नसल्याचे दिसत आहे. रस्त्यांची अवस्था पहिली तर नीट माणसालाही चालत येत नाही तिथून स्ट्रेचर कसे नेणार. पण गरज काहीही करायला लावते त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांना त्याच चिखलातून गेल्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण चिखलाच्या रस्त्यावर नातेवाईकाची किती तारांबळ उडाली ते स्थानिक राजकारण्यांना येथील आरोग्य व्यवस्थेला दिसेल तर देव पावला म्हणावं लागेल. या संदर्भांत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी मात्र मौनच बाळगले आहे.

दरम्यान या प्रकाराने आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. तसेच जिल्ह्याप्रमाणे आरोग्य यंत्रणाचीही दुष्काळीच आहे हे यातून सिद्ध झाल आहे.

Leave a Comment