कृष्णा नदीपात्रात उडी टाकून महिलेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील पुलावरून महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

सुनंदा प्रकाश माने (वय 48) रा. विंग ता. कराड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास चालू आहे. या प्रकाराने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील कृष्णा कॅनॉल नजीक नवीन कृष्ण पुलावरून सुनंदा माने यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी टाकल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मात्र, या घटनेत सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

त्यानंतर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. महिलेने आत्महत्या का केली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास चालू आहे.

Leave a Comment