डहाणूध्ये एटीएम गाळ्याला आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी | डहाणूध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोटक महिंद्राच्या बँकेच्या एटीएम च्या गाळ्याला आग लागली. ह्या घटनेत सर्व काही जळून खाक झाल आहे. सुदैवाने आगीत एटीएम वाचले आहे पण आगीत आतील सर्व फर्निचर जळून खाक झालं आहे. डहाणू इराणी रोड वरील अभ्यंकर कंपाउंड येथे हि घटना घडली.
अदाणी कंपनीच्या अग्नीशमन दलाने मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दालने वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. घटना स्थळी बघ्यांनी खूप गर्दी केली होती. आपत्कालीन व्यवस्था सक्षम असल्याने मोठ्या प्रमाणावर होणारं नुकसान टाळण्यात यश मिळालं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रसंगामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Comment