तिसंगी तलावाचा पाणी प्रश्न पेटणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | गेल्या काही महिन्यांपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आल होतं व प्रशासानाला त्याची दखल घेणेही भाग पडल होत. पण या भागात पावसाळा संपला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भिमा-निरा नदीला पुर येऊन देखील तिसंगी तलाव पाण्याने भरला नसल्याने संतप्त अज्ञात आंदोलकांनी महामंडळाची बस फोडून तिसंगी तलाव पाण्याने भरला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा एका चिठ्ठीद्वारे दिला आहे.

पेरणी अगोदरच संपूर्ण रब्बी हंगाम वाया गेला असून, खरिपाच्या पेरण्या झाल्यात; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळ खरीप पिकही जळून गेली आहेत. जिल्ह्यातील भीमा तसच सीना नदी कोरडी पडली आहे. तर सर्वच लघु, मध्यम व पाझर तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो. ज्वारी, गहू, हरभरा आदी प्रमुख खरीप पिकांची पेरणी या हंगामात शेतकर्‍यांकडून करण्यात येते. यंदा पाऊसच नसल्याने पेरणीसाठी जमिनीत ओलावा नाही.

तालुक्यातील विहिरी कोरड्या आहेत, तर बोअरची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळं डाळिंब बागा संपुष्टात येत आहेत. पश्‍चिम भागातील 10 गावांना व शेतीला पाणी पुरवणारा तिसंगी तलाव यंदा कोरडाठाक असल्यामुळे या 10 गावांतील चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उग्र होत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, हातपंप शेवटचा घटका मोजत आहेत. त्यामुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे तिसंगी तलाव पाण्याने भरला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा एका चिठ्ठीद्वारे काही अज्ञात नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment