पावसामुळे रात्रभर अडकलेले प्रवासी सुखरूप घरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | बुधवारी संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे मध्यरेल्वेच्या प्रवाशांना स्टेशनवरच रात्र काढावी लागली होती. अचानक वाढलेल्या पावसामुळे मुंबई ठप्प झालेली असताना ठाण्यातील अनेक भागांचं जनजीवनही विस्कळीत झालं होतं, अशा परिस्थितीत गुरुवारी सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर प्रवाशांनी सकाळी परतीचा प्रवास केला आणि आपापल्या घरी सुखरूपपणे गेले.

दरम्यान दोन दिवसांच्या धुव्वाधार पावसानंतर बंद पडलेल्या काही लोकल चालू झाल्या असून बुधवारी रद्द झालेल्या लोकल गुरुवारी दुपारपर्यंत पुन्हा सुरळीतपणे चालू होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. डाऊन साईडच्या लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावत असल्याची माहितीही यावेळी रेल्वे प्रशासनाने दिली. प्रवाशांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तसेच लोकलमध्ये चढताना आणि उतरताना घाई करू नये अशा सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. धुव्वाधार पावसामुळे वातावरण तंग असताना सर्वच ठाणेकरांनी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरायला सुरुवात केली आहे.

Leave a Comment