मेळघाटात ई-वन वाघिणीचा पुन्हा धुमाकूळ दोघां वर हल्ला, एका जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती च्या मेळघाट येथील दादरा गावात राहत असणार्‍या २ शेतकर्‍यांवर काल रात्रि मागील ४ महीण्यांपासून दहशत पसरवीणार्‍या नरभक्षक ई-वन  वाघिणीने पून्हा शेतकऱ्यांवर हल्ला चढवून शेतकरर्‍याला ठार केलेले आहे तर एकाला वाघिणीने जखमी केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

चंद्रपुरात माणसांवर हल्ला केल्यामुळे या वाघिणीला मेळघाटात आणण्यात आले होते. मात्र या वाघिनीने मेळघाटात सुद्धा धुमाकूळ घातला. काल या वाघिणीने शोभाराम कालु चव्हाण ४५ या इसमावर रात्री साडे सहा वाजताच्या दरम्यान शेतात हल्ला करून ठार केले ,शोभाराम चव्हाण यांना ठार केल्याची बातमी गावकर्यां पर्यंत पोहोचताच मोठ्या संख्येने गावकरी शोभाराम यांचा मृतदेह आणण्यासाठी निघाले असता या वाघिणीने शोभाराम यांचा पुतण्या दिलीप सरदार चव्हाण यांच्यावर सुद्धा हल्ला करून त्याला जखमी केले. मागील २ महिन्या अगोदर सूध्दा याच वाघिनिने एका 7 वर्षीय बालिकेवर हल्ला केला होता तर अनेक जनावरे ठार केली होती.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काल व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम एस रेड्डी यांना या ई-वन वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती,मात्र काल व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केले व कालच एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. गावकऱ्यांचा रोष पाहता व नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्याने आता या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आहे, जखमींची वन अधिकारी रेड्डी, प्रवीण चव्हाण व आमदार प्रभूदास भिलावेकर यांनी भेट घेतली .

Leave a Comment