राजू शेट्टींनी मोर्चे काढण्या ऐवजी सूचना कराव्यात : चंद्रकांतदादा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे, आंदोलने करण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी सूचना कराव्यात, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी राजू शेट्टी यांना लावला. जिल्हा अधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती आणि मदतीबाबतचा आयोजित केलेल्या बैठकीनंत पाटील बोलत होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसल्याने घरांसह, शेती आणि जनावरांचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात घरांना फटका बसणार नाही, याबाबतची दक्षता घेवून पुनर्वसन केले जाईल. पूरग्रस्तांना जागा खरेदीसाठी सरकारकडून पैसे देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान महापूरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश देण्यात यावे तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात या मागण्यांसाठी ३१ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर केले होते. स्वाभिमानीचे नेते माजी खा. शेट्टी पुराबाबत सरकार गंभीर नसल्याबाबत बोलत आहेत. शेट्टी हे मोठे नेते आहेत, त्यांची प्रगल्भता जादा आहे. मी स्वत: दिवसभरात बारा ते तेरा गावात जावून पूरस्थितीबाबतची माहिती घेतली. त्याठिकाणचे कोणतेही लोक सरकारविरोधात बोलत नाहीत. शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे काढण्यापेक्षा उपाययोजना सूचवाव्यात, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया देत लगावला.

Leave a Comment