सामानातून शिवसेनेची सरकारवर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र | एकीकडे केंद्र सरकारात शिवसेना भाजप सोबत सत्तेत सहभागी आहे. तर दुसरीकडे आज सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने सरकारी अर्थव्यवस्थेबाबतच्या धोरणांबाबत जहरी टीका केली आहे. ‘अर्थव्यस्थेचे अंत्यसंस्कार’ अशा शीर्षक असलेल्या सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारवरच्या अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहे. या अग्रलेखात लिहल्याप्रमाणे नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसाने सत्य सांगितले आहे.

लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. 21 तोफांची सलामी देण्याचा रिवाज त्यात आहे. पण सलामीस वर केलेल्या पोलिसांच्या बंदुकांतून एकही गोळी सुटली नाही. 21 बंदुकांचा ‘चाप’ दाबून पोलिसांची बोटे सुजली. आमची अर्थव्यवस्था त्या फसलेल्या तोफांच्या सलामीसारखीच झाली आहे. सीतारमण यांनी तेच सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवरच टीका केली आहे.

आर्थिक मंदी आणि भ्रष्ट्राचाराने देशात थैमान घातले आहे. त्यातच देशात बेरोजगारी निर्माण झाली आहे. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पाढरा झाला. तसेच अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्याही गमावल्या. सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment