सायरन वाजल्याने एटीएम मधील रक्कम वाचली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | सातपूर परिसरातील शिव कॉलनीतील मयूर अपार्टमेंटखाली असलेल्या एचडीएफसी बँकेच एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.हे काम सुरू असताना अचानक सायरन वाजल्याने एटीम तोडण्याचे काम अर्धवट सोडून युवकांनी पळ काढला. यामुळे मशीनमधील रोकडची चोरी झाली नाही.

 सातपूरमधील शिव कॉलनीत एचडीएफसी बँकेच एटीएम मशीन आहे. पहाटे हे मशीन फोडण्याचा प्रयत्न दोन युवकांकडून करण्यात आला. मशीन फोडण्यासाठी पहारीचा वापर करण्यात आला. चोरट्याने पहारीन एटीम फोडत असताना सायरन वाजल्यान मुंबई येथून नाशिक कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिल्यान पोलीस त्वरित घटनास्थळी आले मात्र चोरटे पसार झाले होते.

या घटनेनंतर परिसरात खळबळ निर्माण झाली, तर एटीम सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा उपस्थित झाला. घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव व बँक अधिकारी यांनी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नाशिक रोड व मखमलाबाद येथील एटीएम मशीन फोडून रोख रक्कम जाण्याच्या घटना ताज्या असताना सातपूरला पुन्हा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेमुळ बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment