पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग ५ दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक रवाना झाले..

महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सलग ५ दिवस हजारो नागरिकांची वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी आणि औषध वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व डॉक्टरांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सॅनेटरी नॅपकीन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किट व इतर जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध शहर शाखांची मदत देखील या पथकासोबत रवाना झाली आहे.

दरम्यान, रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाला शिवसेनेकडून मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आज पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणे गरजेचे आहे. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शिवसेनेकडून जी काही मदत करणे शक्य असेल ते आम्ही करतोच आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना शिवसेनाचा मदतीचा हात आहे. जणूकाही आभाळ फाटलं आणि हे संकट ओढवलय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरजेच असल्याचेही ते म्हणाले होते.

Leave a Comment