लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , 
राज्यातील वातावरण हे भाजपसाठी खूप चांगले आहे. सामान्य जनता हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर खूप समाधानी आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा किंबहुना २०१४ सालच्या जागांहुन अधिक जागा भाजप सेने युतीच्या निवडून येतील. असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला ते आज सांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील वातावरण हे भाजपसाठी खूप चांगले आहे. सामान्य जनता हि नरेंद्र मोदी यांच्या कामावर खूप समाधानी आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा किंबहुना २०१४ सालच्या जागांतून अधिक जागा भाजप सेने युतीच्या निवडून येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर बोलताना सुभाष देशमुख म्हणाले,  ज्या ज्या ठिकाणी चार छावण्यांचे प्रस्ताव आलेले आहेत त्यात्या ठिकाणी चार छावण्यांना मान्यता देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याचबरोबर पाण्याच्या मागणी नुसार सव्वा दोनशे टँकर सध्या सुरु आहेत. आणखीन गरज असेल तर आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर दिले जातील. काही ठिकाणी चारा छावण्यांची मागणी आहे पण प्रस्ताव नाहीत, जिल्ह्यातील संस्थांना विनंती आहे कि ज्याठिकाणी चारा छावण्यांची मागणी आहे तिथल्या संस्थांनी नियमानुसार चारा छावण्यांचे प्रस्ताव तयार करावेत त्या प्रस्तावास मान्यता दिली जाईल असे सांगत  राज्यात एफआरपीचे पैसे मिळावेत यासाठी सरकार सातत्यताने प्रयत्नशील आहे.
साखरकारखान्यांमध्ये साखर खूप मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे ती निर्यात करण्यासाठी सुद्धा राज्यसरकार प्रयत्नशील आहे. साखर उठाव नसल्याने त्यावर काय उपाययोजना करता येईल याचा प्रयत्न सुरु आहे. आचारसंहिता संपल्यावर याच्यावर तोडगा काढू, सॉफ्ट लोन सुद्धा शासनाने देण्याचे ठरवले आहे. आचारसंहिता झाल्यावर थकीत एफआरपीवर नक्की तोडगा निघेल अस आश्वासन त्यांनी दिल.
महत्वाच्या बातम्या

Leave a Comment